Ad will apear here
Next
कीर्ती ऑईलमध्ये नऊ कामगारांचा गुदमरुन मृत्यू


लातूर - वेस्टेज सेटलमेंट टॅंकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील 12 नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती ऑईलमिलमध्ये घडली. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. निलेश पंढरीनाथ शिंदे या एका जखमीवर लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरेंद्र टेकाळ, दगडू शामराव पवार, बळीराम शामराव पवार, रामेश्वर दिगंबर शिंदे , राम नागनाथ येरमे, शिवाजी आतकरे, मारुती गायकवाड, आकाश भुसे, परमेश्वर अरुण बिराजदार अशा नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.


कामगार कल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या मृत्यूच्या तांडवाने उद्योग नगरी हादरली आहे. साडेदहा वाजता मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली. मात्र रात्री 1 वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर आले. तर अन्य टॅंकमध्येच अडकून होते. रात्री घटनास्थळी भेट दिलेल्या कामगार कल्याण मंत्र्यांना नातेवाईकांनी घेराव घालून असे किती बळी जाणार? असा सवाल केला. याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, या आश्वासनानंतरच लोकांनी त्यांची सुटका केली.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातुरातील प्रसिद्ध कीर्ती ऑईल मिलचे नंबर पाटी येथे युनिट आहे. या मिलमधील वेस्टेज सेटलमेंट टॅंकची दर महिना-दीड महिन्यातून बाहेरच्या कामगारांकडून एकदा स्वच्छता करण्यात येते. याचे कंत्राट यावेळी हरंगुळ येथील एका ठेकेदाराला दिले होते. सोमवारी सायंकाळी त्या ठेकेदारासह तीन कामगार या टॅंकच्या स्वच्छतेसाठी मिलमध्ये आले. सुरुवातीला ते तीन कामगार स्वच्छतेसाठी टॅंकमध्ये उतरले. ठेकेदार थोड्यावेळाने परत आला. तर त्याला एकही कामगार दिसला नाही. त्यामुळे तो टाकीत उतरला, तर तोही टाकीत पडला. ही घटना कंपनीच्या कामगारांनी पाहिली आणि त्याला वाचवायला म्हणून अन्य तिघे टॅंकमध्ये उतरले. ते सुद्धा बुडाले. दरम्यान, आत बुडालेल्या कामगारांचे काय झाले? हे पाहण्यासाठी कंपनीचे कामगार निलेश शिंदे यांच्या कमरेला दोर बांधून आत सोडले. त्यांनी श्वास घेता येत नाही, ही तक्रार केल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आली. त्यांची शुद्ध हरपल्याने त्यांना तातडीने लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाकीचे अन्य कामगार मात्र त्या टॅंकमध्येच अडकले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XWHLAY
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language